@वाटेगावच्या @श्रीवासुदेव मंदिरातील @दीपोत्सव…
@वाटेगावच्या @श्रीवासुदेव मंदिरातील @दीपोत्सव…
#कोजागिरी (आश्विन) #पौर्णिमा #कार्तिकपौर्णिमा असा महिनाभर असतो उपक्रम
@राजेंद्रकृष्ण_कापसे...
कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशी महिनाभर भल्या पहाटे काकड आरती अनेक ठिकाणी चालू असते. परंतु सांगली जिल्हातील वाटेगाव येथील वाटेश्वर, विष्णू आणि वासुदेव मंदिरात महिनाभर दीपोत्सव सुरु असतो. या दीपोत्सवाची कार्तिक पौर्णिमे दिवशी यात्रेने सांगता होत आहे. त्या निमित्ताने…
इंटरनेट स्पीड जाळे जरी फोफावत असले, तरी लोकांची देवाविषयी असणारी भक्ती जरा ही कमी झालेली नाही. दरवर्षी @देहु- @आळंदीहुन @पंढरपुरकडे जाणाऱ्याा @वारकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ती दरवर्षी वाढत आहे. गावोगावी अनेक मंदिरांचा @जीर्णोद्धार, मंदिरांची नवीन उभारणी वर्षभर सूर आहे.
तसेच अनेक मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उपक्रम सुरु असतात. यामुळे भक्तगण सतत भक्ती रसात न्हाहत असतो. असाच महिनाभर चालणारा आणखी एक भक्ति सोहळा म्हणजे @काकडआरती सोहळा सध्या राज्यभर सुरु आहे. हा काकड आरती सोहळा @कोजागिरी @आश्विनपौर्णिमा कार्तिकपौर्णिमेच्या दरम्यान प्रामुख्याने सुरु असतो. भल्या पहाटे गुलाबी व बोचऱ्या थंडीत चालणारा हा सोहळा...
भक्तीचीया पोटी बोधकाकडा ज्योति ।
पंचप्राण जीवें भावें ओवाळू आरती ।।
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवीन माथा ।।
असे श्रीहरीचे मुख्यकमल पाहत काकड आरती सुरु होते.
दरम्यान याच महिन्याभराच्या काळात सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील @भोगावती नदी तीरावरील श्रीवासुदेव दीपोत्सव सुरु होतो. या दरम्यान, @श्रीवाटेश्वर व @श्रीविष्णू मंदीरात विविध धार्मिक उपक्रम असतात. संपुर्ण भारतात श्री वासुदेव मंदिरांपैकी वाटेगाव येथील मंदीर व मूर्ती प्रसिद्ध, मोठी व सुंदर आहे.
सुमारे अडीचशे- तीनशे वर्षापूर्वी वाटेश्वर बल्लाळ @दिवेकर यांनी वाटेगाव येथील शिल्पकाराकडून श्रीवासुदेवाची मूर्ती तयार करुन घेतली. यावेळी आणखी दोन मूर्ती त्या मूर्तीकाराने तयार केल्या. सांगली जिल्ह्यातील @भिलवडी व @शेटफळ (तासगाव) येथे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्याचबरोबर वाटेगाव येथील मूर्तीची प्रतिष्ठापना वाटेश्वर दिवेकर यांनी केली. मंदिरात तशीच एकमूर्ती @पंचधातूंची असून @श्रीमतभगवदगीतेत ध्यानाला कसे बसावे. ही सांगणारी श्रीची मूर्ती चतुर्भुज असुन उभी आहे. श्री मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म अशी शस्त्रे आहेत.
मंडित चतुर्भुज दिव्य काना कुंडले ।
श्री मुखाची शोभा पाहता तेज फांकले ।।
वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत ।
शंख चक्र, गदा, पद्म आयुधे शोभत ।।
श्रींची मूर्ती पाहताच असे भागवती काव्य मुखातून नकळत निघते. माथा श्रींचरणी धाव घेतो. श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर वाटेश्वर बल्लाळ दिवेकर यांनी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत जिवंत समाधी घेतली. वाई येथील @विश्वनाथदादा @पाटणकर हे तीर्थयात्रा करीत असताना ते @बद्री @केदारनाथला गेले असताना त्यांच्या मनात निजधामाला (स्वर्गी) जाण्याचा विचार. या वेळी श्रीवासुदेवाने त्यांना दुष्टांत दिला. अजून आपले कार्य संपले नाही. तुम्ही परत जा. असा ढुष्टांत होताच ते परत गावी आले. वाटेगावी मंदिरात आले असताना समाधी हलु लागली. असा चमत्कार त्यांना दिसु लागला. त्यावेळी दिवेकर घराण्यातील सर्वजण अज्ञान अवस्थेत असल्याने ते वाटेगावीच राहिले. मंदिराची व समाधीची देखभाल पाहु लागले.
शके १७६७मध्ये त्यांनी मंदिरासमिर सभामंडप बांधला. तसेच प्रभावळ व सिंहासन सोने पितळ्याचे केले. दिवेकर घराणे सज्ञान होताच ते वाईला परतले व कालांतराने ते महानिर्वाण झाले. श्रींच्या प्रतिष्ठपने पासुनच मंदिरात दीपोत्सव सुरु आहे. याचबरोबर मुर्ती स्थापनेचा वाढदिवस फाल्गुन नवमी ते द्वादशी असा दोन तीन दिवसांचा उत्सव असतो. दीपोत्सवात अश्विन अमावस्येला (लक्ष्मीपुजनादिवशी) गोवर्धन पर्वत बोटावर उचलुन भक्तांचे वारा व पावसापासुन रक्षण केले.त्यागोवर्धन पर्वताची पुजा त्या दिवशी केली जाते.
दुपारी बारा वाजता लाह्या व गुळाच्या पाकाचा डोंगर केला जातो. यावर श्रीवासुदेवाची मुर्ती ठेवुन तिची पुजा अर्चा करुन नैवद्य दाखविला जातो. संपुर्ण मंदिरात झेंडुच्या फुलांची आरास केलेली असते. रात्री श्रींची पालखी रथातुन निघते. दीपोत्सवकाळात मंदिराचा सभामंडप, गाभारा, मंदिराच्या अवती- भवती पणत्या, टांगत्या समया, रंगमाळा, कमानी कंदील, पणत्याचे झाड, यातील दीपप्रज्वलीत करण्यात येतात. यावेळी वीजेचे दिवे बंद करण्यात येतात. यावेळी सर्वमंदिर दिव्यांनी उजाळुन निघालेले असते. हा आगळा-वेगळा क्षण नयनात साठवुन ठेवण्यासाठी अनेकजण दुरवरुन येतात.
सहस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा।
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ।।
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया।
चराचर मोहरलें तुझी मुर्ती पहावया ।।
असे काकड आरतीचे अभंगाप्रमाणे या दीपोत्सवाची रंगत वाढवितात. या दीपोत्सवासाठी रोज सुमारे तीन किलोपेक्षा जास्त गोडे तेल लागते. मंदिर पुर्णपणे खासगी असल्याने मंदिरास कोणताही इनाम नाही. काही वर्षापुर्वी @कुरुंदवाड सरकारने या देवस्थानच्या नावे दैनंदिनी दिवा बत्तीसाठी ५६ रुपये ३१ पैसे ट्रेझरीत ठेवले आहेत. मंदिर उत्तराभिमुख असुन दिवेकरांची समाधी पुर्वाभिमुख आहे. दिवेकर हे मुळचे @गुहागर जवळील वाडे- पाडेगाव येथील होय. वाटेगाव येथे त्यांची पाचवी पिढी आहे. काकड आरती, शेजआरती, दास हरिपाठ, भजन महानैवद्य, आरती एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी आदी ग्रंथाचे पारायण बाराही महिने सुरू असते.
ग्रामदैवत श्रीवाटेश्वराची पार्श्वभुमी अशी की,
@संतश्रेष्ठ @ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात @श्रीचांगदेव महाराज भोगावती तीरी वास्तव्यास होते. यावेळी त्यांना स्वयंभू शिवलिंग सापडले. त्याकाळा पासुन या @शिवलिंगास @काशीतीर्थ मानले जाते. शिवलिंग व मंदिर पुरातन आहे. नदी व मंदिराच्या घाटामध्ये दगडीघाट आहे. या मंदिर व घाटावर सर्व जाती- धर्माचे लोक येऊन दिवे पाजळवितात. नदीच्या पाण्यात मंदिराचे प्रतिबिंब सुरेख दिसते. येथील पुजा- आर्चा गुरव परिवार हे करतात.
महिनाभराच्या दीपोत्सवा दरम्यान श्री वाटेश्वराची तीन वेळा यात्रा भरते. दिवाळीच्या पाडव्याला (बलिप्रतिपदेला) पहिली यात्रा भरते. यावेळी श्रींची पुजा करण्याचा मान @मुळीक घराण्याला असतो. वैकुठ चतुर्दशीला (त्रिपुरारी पौणिमेच्या आदल्या दिवशी) दुसरी यात्रा भरते. यादिवशी शिव व विष्णु भेट असते. शिव व विष्णुस बेल व तुळशी अपर्ण करण्यात येतात. या यात्रेचा मान @नलवडे- पाटील या घराण्याला असतो.
शेवटची व तिसरी यात्रा त्रिपुरारी पौणिमेला असते. यादिवशी श्रीवासुदेव व श्रीवाटेश्वर मंदिरातील दीपोत्सवाची सांगता होते. ही यात्रा @चव्हाण पाटील यांची असते. तर त्या दिवशी यात्रा निघण्यापूर्वी श्रीवाटेश्वराची पुजा करण्याचा @कापसे पाटील घराण्याला असतो. यात्रेच्या पुजेला शिवलिंगावर महाअभिषेक होती.
या यात्रेकाळात गावातील सर्व समाज बांधवाना विविध श्रीवाटेश्वराची सेवा करण्याचा मान असतो. आज हि सर्व समाज बांधव तो मान आंनदाने करतात. संध्याकाळी पुजा अर्चा झाल्यानंतर श्रींची पालखी निघते.
श्रीविष्णु, श्रीविठ्ठल, श्रीवासुदेव मंदिरातुन पालखी काही वेळ नदी किनारी विसावते. यावेळी भक्तगण औट (शोभेच्या दारूची) आतिषबाजी करतात. ही आतिषबाजी दोन- तीन तास सुरु असते. त्यानंतर पालखीपुढे मार्गस्थ होते. यावेळी गावातील लेकी सुना शंभु कैलासाचा पतीला ओवाळतात.
कैलासींचा देवभोळा चक्रवर्ती।
ग्राम स्त्रीया ओवाळती पार्वतीचा पती।।
पालखी बाजारपेठेत आल्यानंतर दांडपट्टा, लेझिम शौर्य कसरतीचे खेळ होतात. धनगरांच्या ओव्या होतात. त्यानंतर पालखी धर्मनाथ (दत्त), मारुती मंदिरामार्गे पहाटे राऊळात येते. मंदिराची तटबंदी, घाट, बुरुज, पुलावर दिवे लावुन दीपोत्सवाची सांगता होते. दुसऱ्या दिवशी तमाशा- करमणुकीचे कार्यक्रम होतात. तर दुपारी कुस्त्यांचा आखड्याने यात्रेची सांगता होते.
@राजेंद्रकृष्ण_कापसे
----------------------









































