Monday, October 29, 2012
Sunday, October 28, 2012
खडकवासला धरण क्षेत्रात साडेअकरा टीएमसी पाणी
राजेंद्रकृष्ण कापसे - सकाळ वृत्तसेवा
खडकवासला धरणांच्या साखळी क्षेत्रात पडत असलेल्या श्रावणसरींच्या पावसामुळे आज (बुधवार) खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणात साडेअकरा टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
मागील आठवड्यात शनिवारपासून या चार ही धरणात सुमारे पाच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. या धरणात मागील 24 तासात 2.58 टीएमसी तर बुधवारी सकाळ पासून दुपार पर्यंत अर्धा टीएमसी पाणीसाठा वाढले आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री दहा वाजता खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढल्याने सुमारे तासभर कालव्यातून 500 क्युसेक्स पाणी कालव्यात सोडले होते.
खडकवासला धरणाच्या साखळी धरणक्षेत्रात बुधवारी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पडलेला पाऊस व धरणाच्या पाणीसाठ्या वाढ झालेली आहे. खडकवासला धरणात 9 मिलिमिटर पाऊस पडला. आता पर्यंत 1.49 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 75.60 टक्के धरण भरले आहे.
पानशेत धरणात 54 मिलिमिटर पाऊस पडला. आता पर्यंत 4.34 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 40.79 टक्के धरण भरले आहे. वरसगाव धरणात 60 मिलिमिटर पाऊस पडला. आता पर्यंत 4.60 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 55.91 टक्के धरण भरले आहे. टेमघर धरणात 56 मिलिमिटर पाऊस पडला. आता पर्यंत 0.95 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 25.73 टक्के धरण भरले आहे. चार ही धरणात मिळून 11.39 टीएमसी पाणीसाठा जमा आहे. तर चार ही धरणे 39.08 टक्के भरली आहेत. मागील वर्षी एक ऑगस्ट रोजी या चार ही धरणात 20.33 टीएमसी पाणी साठा होता. व चार ही धरणे 69.73 टक्के भरली होती.
Subscribe to:
Posts (Atom)

