Tuesday, September 24, 2013

हिरवाईने नटला सिंहगड - - सकाळ वृत्तसेवा मंगळवार, 24 सप्टेंबर 2013

खडकवासला - सिंहगडाच्या डोंगररांगा चार महिन्यांपासून हिरव्यागर्द झाल्या असून, येथील फूल वनस्पती बहरल्या आहेत.


खडकवासला - सिंहगडाच्या डोंगररांगा चार महिन्यांपासून हिरव्यागर्द झाल्या असून, येथील फूल वनस्पती बहरल्या आहेत. कासच्या पठारावरचा अनुभव सध्या पर्यटकांना येत आहे. तेरडा, सोनकी व कारवी या वनस्पती गडावर आहेत.


""कारवीची झाडे प्रामुख्याने डोंगराच्या उतारावर आहेत. घाट रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात कारवीची झाडे आहेत. त्याची फुले एका वेळी येत नाहीत. तेरड्याप्रमाणे त्यांची झालर दिसत नाही,'' असे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले. खरपुडी व तिच्या विविध जातीही गडावर आढळतात, असेही त्यांनी सांगितले.






कास पठार व सिंहगड एकाच रांगेतील प्रदेश आहेत. दोन्ही ठिकाणच्या अनेक वनस्पतींमध्ये साम्य आहे; परंतु सिंहगड परिसरात पठार व वनस्पतींची संख्या तुलनेने कमी आहे, असे उपवनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, ""तेरडा, सोनकी व कारवी खरपुडी बरोबर हळुंदा, भारंगी, चिरे आमरी, दिंडा, कडू कारंदा, कचोरा, रान आले, काटे कोरांटी, कौला (बारका), कावळी, खोबरदोडा, रान फावटा, फापड, रानजीरे, कारवी, सोनकी, निचुर्डी, बोंदारा, शतावरी, म्हाळुंग, पांढरी मुसळी व काळी मुसळी अशी फुले आढळतात.''

Sunday, September 8, 2013

जिल्हाध्यक्षपदी पाबळे, तर शहराध्यक्षपदी कापसे


पुणे जिल्हा, शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची निवडणूक बिनविरोध


शहराध्यक्षपदी राजेंद्रकृष्ण कापसे


पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख



पुणे शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणी



शहराध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे




जिल्हाध्यक्ष शरद पाबळे

पुणे 8 : पुणे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पुणे शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची निवडणूक शनिवारी बिनविरोध पार पडली. जिल्हाध्यक्ष म्हणून शरद पाबळे यांची तर शहराध्यक्षपदी राजेंद्रकृष्ण कापसे यांची वर्णी लागली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख, परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, विभागीय सचिव डी.के. वळसे-पाटील, व पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, यांच्या उपस्थितीत ही निवडणूक झाली. श्रीराम कुमठेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

जिल्हा कार्यकारणी-

जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे, सचिवपदी राजेंद्र सांडभोर, कोषाध्यक्षपदी रमेश जाधव यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी डॉ. विजयकुमार भिसे, दत्तात्रय सुर्वे, प्रविण कदम, ज्ञानेश्वर मिडगुले, धनंजय थोरात, सुनिल वाळुंज, रामदास जगताप, सुजाता गुरव, सहचिटणीस एम. जी. शेलार, दत्ता म्हसकर, महिला प्रतिनिधी दिपाली मदन काळे, कार्यकारणी सदस्य मधुकर गायकवाड, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तालुका निमंत्रक सुभाष शेटे, मराठी पत्रकार परिषद कार्यकारणी सदस्य प्रा. दत्ता कारंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शहर कार्यकारणी-

निलेश कांकरिया, सचिव सुशांत सोनोने, अपाध्यक्ष अमोल साबळे, मंदार कदम, विवेकानंद काटमोरे, रूपाली अवचरे, कोषाध्यक्ष मेघा शिंपी, सहचिटणीस सागर जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

मतभेद बाजूला ठेवा-
शहर आणि ग्रामिण कार्यकारणीला मार्गदर्शन करताना पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख म्हणाले "आपसातील व्यक्तीगत, संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवा. राज्यातील सर्व पत्रकारानी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावे. आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांची दखल घेणार नाही."



40 photo on my facebook
https://www.facebook.com/RAJENDRAKRUSHNA/posts/652342608118534?notif_t=like