Monday, October 29, 2012


ओढ्यात वाहत गेलेला "मोहित'सापडला ============== खडकवासला - खेळताना ओढ्यात पडलेला चार वर्षांचा मुलगा वाहून गेला. अंधार पडला तरी तो घरी न आल्याने शोधाशोध व रडारड सुरू झाली. शेजारचे तीन तरुण नदीच्या दिशेने शोधत गेले. त्या वेळी दाट झुडपातून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने ते गेले असता आळूच्या बेटात ते कुत्रे मुलाच्या शेजारी उभे होते. ही घटना सिंहगड रस्त्यावरील रामनगर परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली. मोहित बाळू कावळे असे मुलाचे नाव आहे. ब्रह्मा हॉटेल चौकामागे रामनगर वस्तीत तो राहतो. वस्तीजवळच्या ओढ्यात वडगाव जलशुद्धीकरण केंद्र व ड्रेनेजचे पाणी सोडले असल्यामुळे, तो बारमाही वाहतो. मोहित सायंकाळी सहा-साडेसहा वाजण्याच्या सुमारास एकटाच खेळत होता. खेळताना अचानक तो पाण्यात पडला. त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या एका आजीला पाण्यात काही तरी पडल्याचा आवाज आला होता. दरम्यान, मोहित घरी न आल्याने त्याची आजी सखुबाई कावळे त्याला शोधू लागल्या. तो रामनगरमध्ये कोठेच सापडला नाही. त्यांनी घरी जाऊन ही हकिगत सांगितली. त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या आजींनी मघाशी पाण्यात काही तरी पडल्याचा आवाज आल्याचे सांगितले. त्यामुळे ओढ्यात शोधले; परंतु तो सापडला नाही. त्याला शोधण्यासाठी रामनगरमधील गणेश भांडवलकर, रवी राठोड व महेश मोरे हे तिघे जण ओढ्याच्या दिशेने पळत आले. ओढ्याच्या बाजूस असलेल्या झाडातून त्यांना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. ते आवाजाच्या दिशेने गेले. त्या वेळी तो मुलगा आळूच्या पानाच्या बेटात अडकून पडल्याचे दिसले. त्याने आळूच्या पानाला धरले होते. त्या वेळी त्याच्या शेजारी कुत्रे होते. या तिघांनी मोहितची सुटका केली. तेथून काही अंतरावर एक छोटा सापही होता, असे त्या तिघा तरुणांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. ==========================================================

Sunday, October 28, 2012

खडकवासला धरण क्षेत्रात साडेअकरा टीएमसी पाणी राजेंद्रकृष्ण कापसे - सकाळ वृत्तसेवा खडकवासला धरणांच्या साखळी क्षेत्रात पडत असलेल्या श्रावणसरींच्या पावसामुळे आज (बुधवार) खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणात साडेअकरा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मागील आठवड्यात शनिवारपासून या चार ही धरणात सुमारे पाच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. या धरणात मागील 24 तासात 2.58 टीएमसी तर बुधवारी सकाळ पासून दुपार पर्यंत अर्धा टीएमसी पाणीसाठा वाढले आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री दहा वाजता खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढल्याने सुमारे तासभर कालव्यातून 500 क्‍युसेक्‍स पाणी कालव्यात सोडले होते. खडकवासला धरणाच्या साखळी धरणक्षेत्रात बुधवारी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पडलेला पाऊस व धरणाच्या पाणीसाठ्या वाढ झालेली आहे. खडकवासला धरणात 9 मिलिमिटर पाऊस पडला. आता पर्यंत 1.49 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 75.60 टक्के धरण भरले आहे. पानशेत धरणात 54 मिलिमिटर पाऊस पडला. आता पर्यंत 4.34 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 40.79 टक्के धरण भरले आहे. वरसगाव धरणात 60 मिलिमिटर पाऊस पडला. आता पर्यंत 4.60 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 55.91 टक्के धरण भरले आहे. टेमघर धरणात 56 मिलिमिटर पाऊस पडला. आता पर्यंत 0.95 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 25.73 टक्के धरण भरले आहे. चार ही धरणात मिळून 11.39 टीएमसी पाणीसाठा जमा आहे. तर चार ही धरणे 39.08 टक्के भरली आहेत. मागील वर्षी एक ऑगस्ट रोजी या चार ही धरणात 20.33 टीएमसी पाणी साठा होता. व चार ही धरणे 69.73 टक्के भरली होती.

'पुणे बस डे'चे मला कौतुक - सचिन ref esakal ===================================================== सचिनच्या शुभेच्छा त्याच्या शब्दांत भारतातील बहुतेक शहरांत वाहतुकीची समस्या गंभीर होत असताना पुणे शहरात एक नोव्हेंबर हा "बस डे' म्हणून साजरा होत आहे, याचे मला जास्त कौतुक वाटत आहे. मला कुठेतरी एक विचार वाचल्याचे आठवते, की "देशाची प्रगती, ही त्या देशात किती महागड्या कार आहेत, यावरून ठरत नसते; तर महागड्या कार असलेले किती लोक मनापासून पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरतात, यावरून दिसते.' मला हा विचार मनाला भावला; कारण शहरात प्रभावी सार्वजनिक वाहतुकीची साधने असली, तर त्या शहराचे सौंदर्य वाढते, हे लंडन शहराकडे बघून कळते. काय सुंदर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे लंडनची. इतकेच काय, मुंबई शहरात लोकल ट्रेन्सचे जाळे नसते, तर मुंबईच्या वाहतुकीचे काय हाल झाले असते, याचा विचार केला, तरी अंगावर काटा उभा राहतो. एक नोव्हेंबरला पुणेकर "बस डे' साजरा करणार असल्याचे समजले. पुण्याची वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हे चांगले पाऊल आहे; कारण माझ्या मते वाहतुकीच्या समस्येवर पब्लिक ट्रान्स्पोर्टचा प्रभावी वापर, हाच एकमेव उपाय आहे.

Monday, September 3, 2012

SINHGAD: मावळची परंपरा होतेय इतिहासजमा- राजेंद्रकृष्ण कापसे...

SINHGAD: मावळची परंपरा होतेय इतिहासजमा- राजेंद्रकृष्ण कापसे...: मावळची परंपरा होतेय इतिहासजमा- राजेंद्रकृष्ण कापसे REF BY SAKAL http://online2.esakal.com/esakal/20120903/5360216907291372944.htm पुण्य...

मावळची परंपरा होतेय इतिहास जमा- राजेंद्रकृष्ण कापसे


मावळची परंपरा होतेय इतिहास जमा- राजेंद्रकृष्ण कापसे   REF BY SAKAL

http://online2.esakal.com/esakal/20120903/5360216907291372944.htm 

 पुण्यातील गणेशोत्सव म्हटला, की एकेकाळी मावळातील ढोल-ताशा पथकांचे मोठ्या प्रतिष्ठेने नाव घेतले जायचे; पण आता परिस्थिती बदलली आहे. विसर्जन मिरवणुकीवर एकेकाळी वर्चस्व असणाऱ्या मावळातील ढोल-झांज-ताशांचे खेळ आता कमी होत असल्याचे चित्र आहे. अनेक गावांतील ही खेळांची पथकेही नाहीशी होत आहेत. त्याची विविध कारणे असून, या खेळासाठी आवश्‍यक असणारी आपुलकी, गावपणाची भावना आणि एकी कमी झाल्याची खंत अनेक जण व्यक्त करत आहेत. 

काय आहे मावळी परंपरा... 

गावोगावच्या वार्षिक उत्सवात, छबिन्यादरम्यान पथकांची हजेरी शिवजयंती, गणेशोत्सवामध्ये खेळ लग्नाची वरात, इतर मिरवणुकांमध्ये सहभाग छबिन्यात या खेळांची स्पर्धा होत असे; त्यातून बक्षिसे मिळवली जात गावकीच्या कार्यक्रमांत मोफत खेळ केले जातात.

कोठे आहे परंपरा... 

 भोर, वेल्हे, हवेली, मावळ व मुळशी तालुक्‍यांत संख्या जास्त. प्रत्येक गाव, वाडीवस्तीमध्ये किमान एकतरी खेळ.दहा ढोल, दहा ताशे, सोळा झांज, एक घंटा असा मिळून 40 ते 45 जणांचा एक खेळ. ढोल-ताशा, झांज यांची संख्या व किती तास खेळायचे, यावर सुपारी ठरते. कन्याकुमारी, चेन्नईपासून बंगाल, राजस्थानसह दिल्लीपर्यंत अनेक खेळ पोचले. पूर्वी बैलगाडी, सायकल; तर कधी चालत जाऊन खेळ सादर होत. 

 खेळ बंद होण्याची कारणे 

दोन पिढींतील अंतर वाढल्याने खेळासाठी मुलांची कमतरता मोठ्या व्यक्तींच्या शब्दाला मान नाही खेळ करण्यास गेल्यानंतर व्यसनाधीनता वाढली. खेळामुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या बदलत्या काळानुसार शिक्षण आणि पैशाला आलेले महत्त्व वेगळ्या चुली झाल्याने वाढलेल्या जबाबदाऱ्या शिक्षणानिमित्त तरुणांची शहराकडे धाव मंडळात आर्थिक, राजकीय मानापमानाचे वाद, शिस्तीचा अभाव वाढत्या शहरीकरणामुळे लोप पावलेली आपुलकी...

खेळामुळे झालेली विकासकामे 

गावातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार कुस्तीच्या तालमीची पुनर्बांधणी मंडळांच्या "श्रीं' साठी दागिन्यांची खरेदी धार्मिक उत्सवांना मदत गावात फंड आणि भिशीस सुरवात गरजू विद्यार्थ्यांना वह्या- पुस्तके, गणवेश वाटप 

खेळातून जनजागृती 

 या खेळात अनेक विषयांवर जनजागृती केली जाते. त्यात कुस्ती, धार्मिक-पौराणिक, ऐतिहासिक देखावे सादर केले जातात. अनेक पथकांनी हुंडाबळी, अंधश्रद्धा, ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, तंटामुक्तीवरही देखावे सादर करून जनजागृती केली आहे. 

आम्ही नव्याने उभे राहतोय... 

विविध कारणांमुळे चार-पाच वर्षांपासून बंद झालेली परंपरा नव्या जोमाने कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, किरकटवाडीतील हिंद तरुण मंडळ, खडकवासला येथील जयहिंद, लिंबाची, मधली तालीम, शिवणे येथील जयहिंद तरुण मंडळ, कोपरे येथील शिवाजी तरुण मंडळ, बावधन, कोंढवे-धावडे येथील ग्रामस्थ आणि आगळंबे येथील श्री गुरूदेव दत्त मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

गावातील अनेक तरुण कामानिमित्त पुण्यात गेले. आम्ही आमचा खेळ न मोडता, कोथरूड येथील सुतारदऱ्यात सराव करतो. या खेळाच्या पैशातूनच गावात दहा लाख रुपये खर्चून मंदिर उभारले;तर सुतारदऱ्यातही मंडळाच्या नावाने जागा घेऊन एक खोली बांधली, असे मुळशी तालुक्‍यातील भांबर्डे गावाचे गोविंद सरुसे यांनी सांगितले.

 http://online2.esakal.com/esakal/20120903/5360216907291372944.htm