Monday, September 3, 2012

मावळची परंपरा होतेय इतिहास जमा- राजेंद्रकृष्ण कापसे


मावळची परंपरा होतेय इतिहास जमा- राजेंद्रकृष्ण कापसे   REF BY SAKAL

http://online2.esakal.com/esakal/20120903/5360216907291372944.htm 

 पुण्यातील गणेशोत्सव म्हटला, की एकेकाळी मावळातील ढोल-ताशा पथकांचे मोठ्या प्रतिष्ठेने नाव घेतले जायचे; पण आता परिस्थिती बदलली आहे. विसर्जन मिरवणुकीवर एकेकाळी वर्चस्व असणाऱ्या मावळातील ढोल-झांज-ताशांचे खेळ आता कमी होत असल्याचे चित्र आहे. अनेक गावांतील ही खेळांची पथकेही नाहीशी होत आहेत. त्याची विविध कारणे असून, या खेळासाठी आवश्‍यक असणारी आपुलकी, गावपणाची भावना आणि एकी कमी झाल्याची खंत अनेक जण व्यक्त करत आहेत. 

काय आहे मावळी परंपरा... 

गावोगावच्या वार्षिक उत्सवात, छबिन्यादरम्यान पथकांची हजेरी शिवजयंती, गणेशोत्सवामध्ये खेळ लग्नाची वरात, इतर मिरवणुकांमध्ये सहभाग छबिन्यात या खेळांची स्पर्धा होत असे; त्यातून बक्षिसे मिळवली जात गावकीच्या कार्यक्रमांत मोफत खेळ केले जातात.

कोठे आहे परंपरा... 

 भोर, वेल्हे, हवेली, मावळ व मुळशी तालुक्‍यांत संख्या जास्त. प्रत्येक गाव, वाडीवस्तीमध्ये किमान एकतरी खेळ.दहा ढोल, दहा ताशे, सोळा झांज, एक घंटा असा मिळून 40 ते 45 जणांचा एक खेळ. ढोल-ताशा, झांज यांची संख्या व किती तास खेळायचे, यावर सुपारी ठरते. कन्याकुमारी, चेन्नईपासून बंगाल, राजस्थानसह दिल्लीपर्यंत अनेक खेळ पोचले. पूर्वी बैलगाडी, सायकल; तर कधी चालत जाऊन खेळ सादर होत. 

 खेळ बंद होण्याची कारणे 

दोन पिढींतील अंतर वाढल्याने खेळासाठी मुलांची कमतरता मोठ्या व्यक्तींच्या शब्दाला मान नाही खेळ करण्यास गेल्यानंतर व्यसनाधीनता वाढली. खेळामुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या बदलत्या काळानुसार शिक्षण आणि पैशाला आलेले महत्त्व वेगळ्या चुली झाल्याने वाढलेल्या जबाबदाऱ्या शिक्षणानिमित्त तरुणांची शहराकडे धाव मंडळात आर्थिक, राजकीय मानापमानाचे वाद, शिस्तीचा अभाव वाढत्या शहरीकरणामुळे लोप पावलेली आपुलकी...

खेळामुळे झालेली विकासकामे 

गावातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार कुस्तीच्या तालमीची पुनर्बांधणी मंडळांच्या "श्रीं' साठी दागिन्यांची खरेदी धार्मिक उत्सवांना मदत गावात फंड आणि भिशीस सुरवात गरजू विद्यार्थ्यांना वह्या- पुस्तके, गणवेश वाटप 

खेळातून जनजागृती 

 या खेळात अनेक विषयांवर जनजागृती केली जाते. त्यात कुस्ती, धार्मिक-पौराणिक, ऐतिहासिक देखावे सादर केले जातात. अनेक पथकांनी हुंडाबळी, अंधश्रद्धा, ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, तंटामुक्तीवरही देखावे सादर करून जनजागृती केली आहे. 

आम्ही नव्याने उभे राहतोय... 

विविध कारणांमुळे चार-पाच वर्षांपासून बंद झालेली परंपरा नव्या जोमाने कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, किरकटवाडीतील हिंद तरुण मंडळ, खडकवासला येथील जयहिंद, लिंबाची, मधली तालीम, शिवणे येथील जयहिंद तरुण मंडळ, कोपरे येथील शिवाजी तरुण मंडळ, बावधन, कोंढवे-धावडे येथील ग्रामस्थ आणि आगळंबे येथील श्री गुरूदेव दत्त मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

गावातील अनेक तरुण कामानिमित्त पुण्यात गेले. आम्ही आमचा खेळ न मोडता, कोथरूड येथील सुतारदऱ्यात सराव करतो. या खेळाच्या पैशातूनच गावात दहा लाख रुपये खर्चून मंदिर उभारले;तर सुतारदऱ्यातही मंडळाच्या नावाने जागा घेऊन एक खोली बांधली, असे मुळशी तालुक्‍यातील भांबर्डे गावाचे गोविंद सरुसे यांनी सांगितले.

 http://online2.esakal.com/esakal/20120903/5360216907291372944.htm

No comments:

Post a Comment