'पुणे बस डे'चे मला कौतुक - सचिन ref esakal
=====================================================
सचिनच्या शुभेच्छा त्याच्या शब्दांत
भारतातील बहुतेक शहरांत वाहतुकीची समस्या गंभीर होत असताना पुणे शहरात एक नोव्हेंबर हा "बस डे' म्हणून साजरा होत आहे, याचे मला जास्त कौतुक वाटत आहे. मला कुठेतरी एक विचार वाचल्याचे आठवते, की "देशाची प्रगती, ही त्या देशात किती महागड्या कार आहेत, यावरून ठरत नसते; तर महागड्या कार असलेले किती लोक मनापासून पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरतात, यावरून दिसते.' मला हा विचार मनाला भावला; कारण शहरात प्रभावी सार्वजनिक वाहतुकीची साधने असली, तर त्या शहराचे सौंदर्य वाढते, हे लंडन शहराकडे बघून कळते. काय सुंदर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे लंडनची. इतकेच काय, मुंबई शहरात लोकल ट्रेन्सचे जाळे नसते, तर मुंबईच्या वाहतुकीचे काय हाल झाले असते, याचा विचार केला, तरी अंगावर काटा उभा राहतो. एक नोव्हेंबरला पुणेकर "बस डे' साजरा करणार असल्याचे समजले. पुण्याची वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हे चांगले पाऊल आहे; कारण माझ्या मते वाहतुकीच्या समस्येवर पब्लिक ट्रान्स्पोर्टचा प्रभावी वापर, हाच एकमेव उपाय आहे.

सचिनच्या शुभेच्छा त्याच्या शब्दांत
ReplyDeleteभारतातील बहुतेक शहरांत वाहतुकीची समस्या गंभीर होत असताना पुणे शहरात एक नोव्हेंबर हा "बस डे' म्हणून साजरा होत आहे, याचे मला जास्त कौतुक वाटत आहे. मला कुठेतरी एक विचार वाचल्याचे आठवते, की "देशाची प्रगती, ही त्या देशात किती महागड्या कार आहेत, यावरून ठरत नसते; तर महागड्या कार असलेले किती लोक मनापासून पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरतात, यावरून दिसते.' मला हा विचार मनाला भावला; कारण शहरात प्रभावी सार्वजनिक वाहतुकीची साधने असली, तर त्या शहराचे सौंदर्य वाढते, हे लंडन शहराकडे बघून कळते. काय सुंदर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे लंडनची. इतकेच काय, मुंबई शहरात लोकल ट्रेन्सचे जाळे नसते, तर मुंबईच्या वाहतुकीचे काय हाल झाले असते, याचा विचार केला, तरी अंगावर काटा उभा राहतो. एक नोव्हेंबरला पुणेकर "बस डे' साजरा करणार असल्याचे समजले. पुण्याची वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हे चांगले पाऊल आहे; कारण माझ्या मते वाहतुकीच्या समस्येवर पब्लिक ट्रान्स्पोर्टचा प्रभावी वापर, हाच एकमेव उपाय आहे. ref sakal