Sunday, January 27, 2013

बिबट्या, मगर पकडण्याचा प्रश्‍नच नाही - उपवनसंरक्षक------------ ref sakal ------------------------------------------------------ खामगाव मावळ - सिंहगडच्या जंगलात दिसलेला बिबट्याच्या पायाचा ठसा. खडकवासला - सिंहगडच्या जंगलातील बिबट्या आणि खडकवासला धरणात दिसलेली मगर पकडण्याचा अद्याप कोणताच प्रस्ताव नाही. हे दोन्ही वन्यजीव मानवीवस्तीत आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना पकडण्याचा प्रश्‍न उपस्थित होत नाही, असे वन विभागाचे उपवनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले.
सिंहगडच्या पश्‍चिमेला असलेल्या जंगलात पाळीव प्राण्यांवर झालेला हल्ला बिबट्याने केला आहे. या परिसरातील अनेक प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळले आहेत. त्यातील एक ठसा बिबट्याचा असून तो थोडा पुसट आहे. त्याचे छायाचित्र वनकर्मचाऱ्यांना मिळाले आहे. त्यामुळे, या परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्यास सांगितले आहे. बिबट्या दिसलेली ठिकाणे जंगलातील आहे. त्याच्याकडून माणसांना उपद्रव झालेला नाही. त्यामुळे, त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचा प्रस्ताव नाही. हल्ला झालेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले. सिंहगडच्या जंगलात बिबट्याचा आणि खडकवासला धरणात मगरीचा वावर स्पष्ट झाला आहे. त्यामुळे, पर्यटक आणि ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कदम यांनी केले.

No comments:

Post a Comment