Saturday, February 2, 2013
'योजना घेऊन येतो; जमिनी विकू नका... '
- सकाळ वृत्तसेवा.....................
Saturday, February 02, 2013 AT 12:30 AM (IST)
Tags: prabhakar deshmukh, pmc, farmer, pune
खडकवासला - ""पानशेत परिसर ऐतिहासिक खोरे आहे. शेतकऱ्यांनो एकत्रित या. आम्ही तुमच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना घेऊन येऊ, जमिनी विकू नका,'' असा सल्ला विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी येथील ग्रामस्थांना दिला.
शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत पानशेत (ता. वेल्हे) येथे "शासन आपल्या दारी' या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी देशमुख बोलत होते. आमदार संग्राम थोपटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील, प्रांताधिकारी संजय आसवले, सभापती नगिने, उपसभापती सविता वारघडे, वसुधा नलवडे, राजेश निवंगुणे, संतोष दसवडकर, सरपंच स्वाती गायकवाड, रेवणनाथ दारवटकर, भगवान पासलकर, तहसीलदार शिवाजीराव तळपे, गटविकास अधिकारी सुनील सोनवणे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ""या परिसरात डॉक्टर, शिक्षक वेळेवर पोचत नाही. त्यामुळे ग्राम आरोग्य संजिवनी योजनेला वेगळे निकष व अधिक प्राधान्य देणार आहे. आपली शाळा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत लक्ष ठेवा. मुलांच्या संस्कार व शिक्षणाकडे आताच लक्ष द्या.''
थोपटे म्हणाले, ""आमच्या भागात धरणे आहेत; पण आम्हाला पाणी फक्त दिसते. ते आम्हाला शेतीला वापरता येत नाही. प्रत्येक वेळा संघर्ष करावा लागतो. धरण, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू.''
या अभियानासाठी शासनाच्या सर्व विभागाच्या विविध योजनांचे स्टॉल येथे उभारले होते. प्रत्येकासाठी एक तरी योजना येथील प्रत्येक स्टॉलमध्ये आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तळपे यांनी केले.
वहिवाट करणाराच मालक
सातबारा उताऱ्यावर सध्याच्या वारसाचे नाव येईल. अद्ययावत सातबाऱ्याचे चावडीवाचन केले जाईल. कुळकायद्यानुसार वहिवाट करणाराच मालक आहे. या परिसरात राबविलेल्या उपक्रमाबाबत मी फारसा समाधानी नाही, असे देशमुख यांनी सांगितले.
=================
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment