Thursday, December 8, 2011

वीरांनी प्रामाणिक काम केले असते तर... सकाळ वृत्तसेवा Wednesday, November 09, 2011 AT 12:38 AM (IST) Tags: khadakwasla constituency, ajit pawar, ncp, pune पुणे - खडकवासला पोटनिवडणुकीत या वीरांनी प्रामाणिकपणे काम केले असते तर... आज निकाल वेगळा दिसला असता, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासलाच्या पराभवाची सल स्थानिक नेत्यांसमोर व्यक्त केली, अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे. विकास आराखडा मंजूर करण्यासाठी समाविष्ट गावातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले होते. पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे, विकास आराखडा तातडीने मंजूर करण्यासाठी हे शिष्टमंडळ आले होते. यात खडकवासला मतदार संघातील दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करताना पवार म्हणाले, येथे आलेल्या सर्व खडकवासल्यातील वीरांनी जर प्रामाणिकपणे काम करून प्रत्येकाने दोनशे ते पाचशे जास्त मतदान मिळविले असते, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व आरपीआय (गवई गट) या आघाडीचा उमेदवार विजयी झाला असता.

No comments:

Post a Comment