Thursday, December 8, 2011

पासपोर्ट पोलिस पडताळणीसाठी हवेलीत विशेष मोहीम - Friday, October 21, 2011 AT 02:45 AM (IST) Tags: passport, police verificate, khadakwasala, pune खडकवासला - हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पासपोर्टसाठी सोमवारपासून (ता. 24) विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली. हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे दीड हजार पारपत्राची पडताळणी अद्याप झालेली नाही. विविध कारणांमुळे ती रखडली होती. यासाठी सात दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ता. 24- ऑक्‍टोबर हिंगणे खुर्द, ता. 25- माणिकबाग- वडगाव बुद्रुक (गावठाण), ता. 26- खडकवासला, डोणजे, गोऱ्हे, खानापूर, ता. 27- वडगाव-खुर्द, नांदेड, ता.28- धायरी, ता. 29- सनसिटी, आनंदनगर परिसर, ता. 30- आंबेगाव, नऱ्हे, जांभूळवाडी, कोळेवाडी, ता.31- कोंढवा बुद्रुक, उंड्री पिसोळी, वडाची वाडी. हवेली पोलिस ठाण्यातील सर्व गावांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत काम सुरू राहणार आहे. पासपोर्टसाठी जोडलेली मूळ कागदपत्रे व त्याच्या छायांकित प्रती बरोबर आणणे आवश्‍यक आहे. ही पडताळणी हवेली पोलिस ठाणे, हवेली तहसीलदार कचेरी आवार, शुक्रवार पेठ, पुणे येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी हवेली पोलिस ठाण्याच्या 020- 24471833 या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment